अपघातात 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू

। पनवेल । विशेष प्रतिनिधी ।

अज्ञात वाहनाने भरधाव वेगाने वाहन चालवून 25 वर्षीय मुकीम अन्सारी या पादचार्‍याला धडक दिली. यात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी कळंबोली पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मुकीम अहमद अन्सारी हा मच्छी मार्केट जवळ खांदा कॉलनी, नवीन पनवेल येथे राहत असून तो मूळचा उत्तर प्रदेश येथील आहे. तो शोरमा सेंटरवर काम करतो. 19 मे रोजी साडेपाच ते सातच्या दरम्यान मोहम्मद अन्सारी हा स्टील मार्केट, कळंबोली येथे पायी फिरण्यास गेला होता. त्यावेळी पाच नंबर पार्किंग जवळील रस्त्यावर स्टील मार्केट कळंबोली येथे अज्ञात वाहनाने त्याला ठोकर मारून अपघात केला व त्यात त्याचा मृत्यू झाला.

Exit mobile version