| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत शहरातील दहिवली गावातील शिवाजी महाराजनगर मध्ये राहणारे 35 वर्षीय दीपक अनिल शिंदे हे 15 मे 2024 पासून हरवले आहेत. ते हरवले असल्याची तक्रार कर्जत पोलीस ठाण्यात नोंद आलीआहे.
कर्जत पोलीस ठाण्यात दीपक शिंदे यांच्या मातोश्री संगीता अनिल शिंदे यांनी मुलगा हरवला असल्याची तक्रार दिली आहे. दीपक यांचे वय-35 वर्षे, बांधा-मध्यम, रंग-गोरा, उंची 5 फूट 4 इंच, केस काळे, पुढील बाजूस टक्कल पडलेले, अंगात राखाडी रंगाचा उभ्या लाईन असलेला फुल शर्ट व ब्लू जिन्स पॅन्ट, पायात प्लास्टिकची चप्पल, उजव्या हाताचे स्कुटी चालवताना मनगटाचे हाड मोडलेले असून, त्यावर टाके असलेल्या खुणा दिसत आहेत. त्यांच्याबद्दल कोणतीही माहिती मिळाल्यास कर्जत पोलीस ठाणे यांच्याशी संपर्क साधण्याचे आव्हान पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांनी केले आहे.







