विहिरीत पडलेल्या ५ फुटी नागिणीला दिले जिवदान

| मुरूड | वार्ताहार |
मुरूड शहरातील भंडारवाडा येथिल बाबा पालशेतकर  यांच्या विहिरीत पडलेल्या ५ फुटी नागिणीला सर्प मित्र संदीप घरतने जिवदान दिले आहे. आज सकाळी भारती माळी यांनी विहीरीत सर्प पडल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी सर्पमित्र संदीप घरत यांना पाचारण करण्यात आले. या विहिरीत पडलेल्या सर्पला एका काठीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले. नंतर त्या सर्पाला संदीप घरतने हाताने पकडून बरणीत जेरबंद केले.  हा सर्प नागिण असुन याची लांबी सुमारे ५ फुट असल्याचे सर्पमित्राने सांगितले. या नागिणीला वनखात्याच्या मदतीने जंगलात जाऊन सोडून देण्यात आले आहे.

Exit mobile version