52 वर्षीय महिलेची फसवणूक

। पनवेल । वार्ताहर ।

खारघरमध्ये राहणार्‍या विवाहितेला अज्ञात सायबर चोरट्याने बँक खाते बंद करण्यात येत असल्याची भिती दाखवत, तसेच केवायसी अपडेट करण्याबाबतची लिंक पाठवून त्यांच्या बँक खात्यातून तब्बल 12.77 लाखांची रक्कम परस्पर दुसर्‍या खात्यात वळती केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकरणात फसवणूक झालेली 52 वर्षीय महिलेला 1 ऑक्टोबर रोजी सायबर चोरट्याने अ‍ॅक्सिस बँकेचा कर्मचारी असल्याचे भासवून त्यांना संपर्क साधला होता. तसेच, त्यांचे केवायसी अपडेट नसल्याचे सांगून केवायसी अपडेट करण्यास सांगितले. अन्यथा त्यांना 3 हजार 500 रुपये दंड भरावा लागेल आणि त्यांचे खाते बंद करण्यात येईल, अशी भिती दाखवली. यानंतर सायबर चोरट्याने या महिलेला केवायसी अपडेट करण्यासाठी एक लिंक पाठवली. ही लिंक उघडून महिलेने आपली संपूर्ण माहिती त्यात भरली. यानंतर सायबर चोरट्याने या माहितीचा गैरवापर करुन दुसर्‍या दिवशी सायंकाळी त्यांच्या खात्यातून 12.77 लाख रुपये दुसर्‍या खात्यात वळते करुन घेतले. याबाबतचे मेसेज विवाहितेच्या मोबाईलवर आल्यानंतर त्यांनी खारघर पोलीस तक्रार दाखल केली आहे.

Exit mobile version