श्री कृष्ण जन्माची 72 वर्षांची परंपरा

| नेरळ | प्रतिनिधी |

नेरळ गावातील टेप आळी येथील किसन खडे आणि नारायण खडे यांच्या घरी श्री कृष्ण जन्माचा सोहळा दरवर्षी साजरा होत असतो. त्यांनी गेल्या 72 वर्षांची परंपरा जपली आहे. या कुटुंबातील तिसरी पिढी ही परंपरा जपण्यासाठी आघाडीवर असल्याचे दिसून आले. कैलास खडे आणि केदार खडे यांनी श्री कृष्ण जन्माचा सोहळा आपलासा केला आहे. ख्ाडे कुटुंबियांकडून शुक्रवारी (दि.4) रात्री 8.00 वाजल्यापासून श्री कृष्णाचा जन्म होईपर्यंत विविध प्रकारचे कार्यक्रम साजरे केले गेले. मध्यरात्री 12.00 वाजता भगवान श्री कृष्णाचा जन्म पाळणा गीत गाऊन पाळणा हलवून साजरा केला गेला. त्या आधी भजनाची बारी पार पडली. खडे कुटुंबातील बहुसंख्य सदस्यांना भजनाची आवड असल्याने सर्वजण भजनामध्ये सहभागी होत असतात. दरम्यान, हा श्री कृष्ण जन्माचा सोहळा पाहण्यासाठी परिसरातील भावीकांची मोठी गर्दी झाली होती.

Exit mobile version