| नवी मुंबई । प्रतिनिधी ।
उलवे भागात राहणार्या एका निवृत्त बँक अधिकार्याच्या खात्यातून एक लाखांची रोख रक्कम परस्पर काढून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी न्हावा शेवा पोलिसांनी फसवणुकीसह आयटी क्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणात फसवणूक झालेले 68 वर्षीय निवृत्त बँक अधिकारी उलवे भागात राहण्यास असून त्यांच्या बँकेतील सर्व्हिसची पेन्शन त्यांच्या बँक खात्यात जमा होते. ही बँक अधिकारी मोबाईलवरून गुगल पेद्वारे लाईट बिल भरण्यासाठी, तसेच पैसे ट्रान्स्फर करण्यासाठी वापरत असत. ऑक्टोबर महिन्यामध्ये हे बँक अधिकारी घरामध्ये असताना, त्यांच्या बँक खात्यातून 98,996 रुपये काढण्यात आल्याचा मेसेज त्यांच्या मोबाईलवर आला. या निवृत्त बँक अधिकार्याने कुणालाही पैसे ट्रान्स्फर केलेले नसताना त्यांच्या खात्यातून ही रक्कम गेल्याने त्यांनी कस्टमर केअरशी संपर्क साधून याबाबतची माहिती दिली होती. त्यानंतर त्यांनी उलवे येथील संबंधित बँकेत तसेच नेरूळ पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली होती.
बँक अधिकार्याला लाखाचा गंडा
