घोड्याच्या किरकोळ वादातून मारहाण

| नेरळ । वार्ताहर ।

माथेरानमध्ये पर्यटक वाहतूक घोडा सुटून मालवाहू घोड्यांमध्ये गेला होता. त्यावरून माथेरानच्या दस्तुरी नाका येथे मालवाहू घोड्यांचे चालक यांनी अश्‍वपालक यांना मारहाण करण्याची घटना घडली असून अश्‍वपालक झालेल्या मारहाणीत गंभीर जखमी झाला आहेत.

जुम्मापट्टी येथील अश्‍वपालक यांच्या ताब्यातील प्रवाशी घोडा क्र.337 हा अमन लॉज येथे बांधुन ठेवला होता. तो घोडा सुटून दस्तुरी नाका येथून माथेरान शहरात मालाची वाहतूक करणार्‍या घोड्यांमध्ये गेला. त्यावेळी मालवाहू घोड्यांचे मालक असलेले नेरळ चिंचआळी भागातील दोघांनी पर्यटक वाहतूक करणारा घोडा क्रमांक 337 वर दगड मारून काठीने मारहाण केली असता पर्यटक वाहतूक करणार्‍या घोड्याचे पालक आणि मालवाहतूक करणार्‍या घोड्याचे चालक यांच्यात शिवीगाळ सुरु झाली. त्यावेळी तेथे बाजुला पडलेली लोखंडी शिग उचलुन नेरळ चिंचआली येथील मालवाहू घोड्यांचे चालक यांनी अश्‍वपालक यांच्या डोक्याचे उजव्या बाजुस दुखापत केली. याबाबत पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास माथेरान पोलीस करीत आहेत.

Exit mobile version