श्रीलंका क्रिकेटला मोठा धक्का

। कोलंबो । वृत्तसंस्था ।

टी-20 विश्‍वचषक स्पर्धेत श्रीलंका क्रिकेट संघाची कामगिरी अगदीच खराब झाली. वनिंदू हसरंगाच्या नेतृत्वात खेळणार्‍या श्रीलंकेचे आव्हान पहिल्याच फेरीत संपले होते. त्यांना चार सामन्यांपैकी फक्त एका सामन्यात विजय मिळवता आला होता. यानंतर आता श्रीलंका क्रिकेटला मोठे धक्के बसत आहेत. बुधवारी (दि.26) महेला जयवर्धनेने श्रीलंकेच्या संघाच्या सल्लागार प्रशिक्षकाच्या पदाचा राजीनामा दिला होता. यानंतर आता ख्रिस सिल्व्हरवूड यांनी श्रीलंका संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी त्यांच्या राजीनाम्यामागे वैयक्तिक कारण असल्याचे सांगितले आहे. त्यांनी म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक असताना दीर्घकाळ तुमच्या प्रेमाच्या माणसांपासून दूर रहावे लागते. माझ्या कुटुंबाबरोबर बरीच चर्चा केल्यानंतर आणि जड अंत:करणाने मला वाटते की आता घरी परतण्याची वेळ आहे आणि कुटुंबासमवेत एकत्र वेळ घालवायचा आहे.तसेच सिल्व्हरवूड यांनी सर्व खेळाडू, प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ आणि श्रीलंका क्रिकेट संघाच्या व्यवस्थापनेचेही आभार मानले.

Exit mobile version