विमला तलावाजवल पादचारी पूलला भगदाड

त्वरित दुरुस्त करण्याची मागणी
। उरण । वार्ताहर ।

उरण नगरपालिकेच्या विमला तलावातील असलेल्या पादचारी पुलाला भले मोठे भगदाड पडले आहे. यामुळे दररोज पहाटेच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी येणार्‍यांना हा मार्ग धोकादायक बनला आहे. त्यामुळे नगरपालिकेने त्वरित लक्ष देऊन तो दुरुस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.
अनेक दिवसांपासून हे भगदाड पडले असून त्याची माहिती नगरपालिका प्रशासनाला देऊनही त्याबाबत कोणतीच उपाययोजना करीत नसल्याचे मॉर्निंग वॉकसाठी येणार्‍यांकडून सांगण्यात आले.

गणेशोत्सवात गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी लहानांपासून थोरांपर्यंत सर्वजण विमला तलाव येथे गर्दी करीतात. आज दहा दिवसांच्या गणरायाचे विसर्जन होणार आहे. त्यावेळीही विमला तलाव येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे. तरी दुर्घटना होण्यापूर्वीच विमला तलाव येथे पादचारी पुलाला पडनलेले भगदाड त्वरित दुरुस्त करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.

Exit mobile version