कोलाड-रोहा राज्यमार्गाला भगदाड

ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत केली उपाययोजना

| कोलाड | वार्ताहर |

मुंबई-गोवा महामार्गाला जोडल्या गेलेल्या कोलाड-रोहा राज्यमार्गाला शुक्रवारी दिवसभर धो धो कोसळणार्‍या पावसात सायंकाळच्या सुमारास पाले खुर्द आणि आशोक नगर यादरम्यान भले मोठे भगदाड पडले. त्यामुळे वाहनचालकांसह प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली.

दरम्यान, मार्गाला लागून कुंडलिका नदीपात्र तर दुसर्‍या बाजूने कालवा वाहत असल्याने वाहणार्‍या पाण्याचा अधिक दाब आल्याने पाणी जाण्याच्या मार्गावर भला मोठा गुरुल लागल्याने मोठा खड्डा पडला तर ते पाणी रस्त्याच्या खालच्या बाजूने वाहत गेल्याने वरती डांबर मात्र खालील रस्त्याची पोखरण झाल्याने रस्त्याच्या खाली मातीची पोखरून भला मोठा खड्डा पडला. त्यामुळे मार्गावरील वाहातूक व्यवस्था तसेच प्रवासीवर्गाला मोठा धोका निर्माण झाला होता, तर या घटनेमुळे कोणताही अनुसूचित प्रकार अथवा धोका निर्माण होऊ नये यासाठी संबंधित खात्याकडून यंत्रणा तैनात करण्यात आली होती.

दरम्यान, पाले खुर्द ग्रामस्थ तसेच या ठिकाणी कोलाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन मोहिते, बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेत आशिष कंट्रक्शन यांची टीम तसेच पाले खुर्द ग्रामस्थ यांच्या वतीने तांत्रिक उपाययोजना करण्यात आली. तद्नंतर या ठिकाणहून एकेरी वाहतुकीसाठी मार्ग मोकळा करण्यात आला.

Exit mobile version