मोहोपाड्यातील बाईकस्वार अपघातात गंभीर जखमी


| रसायनी | वार्ताहर |

खंडाळा येथून मोहोपाडा रसायनी येथे जाणारा युवक मोटारसायकलवरून सायमाळ येथे गुरुवारी रात्री आला असता त्याचा मोटारसायकलवरील ताबा सुटला आणि तो रस्त्याशेजारील बॅरिकेट्सला धडकून खड्ड्यात पडला. सदर अपघाताची माहिती अपघातग्रस्त टीमला समजताच अपघातग्रस्त टीमचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले. या अपघातात मोहोपाडा नवीन पोसरी बुद्धविहार येथील विशाल तायडे आणि त्याचा मित्र दोघे गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावेळी टीमचे भक्ती साठेलकर, अंकुश मोरे, विशाल चव्हाण, संकेत पाटील, विवेक रावळ, चिराग रावळ, मोहन जाधव, पंकज बागुल, कृणाल पाटील, धर्मा पाटील तसेच खोपोलीतील काही युवकांनीदेखील मोलाची मदत केली. यावेळी खोपोली पोलीसही घटनास्थळी हजर होते.

Exit mobile version