प्रशांत नाईक, प्रवीण ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती
। अलिबाग । प्रतिनिधी ।
महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवार चित्रलेखा पाटील यांचा प्रचार अलिबाग शहरात वेगाने सुरू आहे. अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, काँग्रेसचे राज्य प्रदेश सचिव अॅड. प्रवीण ठाकूर, जिल्हा परिषद माजी सदस्य संजय पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी (दि. 9) अलिबाग शहरातील कोळीवाड्यासह चेंढरे व अन्य परिसरात प्रचाराचा धडाका दिसून आला. पदाधिकारी, कार्यकर्ते महिला, तरुण या प्रचारात मोठ्या संख्येने सहभागी होऊन चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांना निवडून देण्यासाठी कामाला लागल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
कोळीवाड्यातील खंडोबाचे दर्शन घेऊन प्रशांत नाईक यांच्या हस्ते नारळ वाढवून प्रचाराला सुरुवात झाली. तर, चेंढरेमधील रोहिदास नगर येथील साईबाबांचे दर्शन घेऊन प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. दरम्यान, चेंढरे ग्रामपंचायत हद्दीतील वॉर्ड क्रमांक एक ते तीनमधील रोहिदास नगर, शिवाजी नगर, नागडोंगरी, विद्यानगर, पंतनगर, गोकुळनगर आदी परिसरातील कार्यकर्ते, मतदारांना भेटून मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. प्रचारासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. एक वेगळा उत्साह आणि उमेद घेऊन कार्यकर्ते मतदारांपर्यंत पोहोचत असल्याचे चित्र दिसून आले.
यावेळी अलिबाग नगरपरिषदेचे माजी नगरसेविक प्रदीप नाईक, अश्विनी पाटील, राकेश चौलकर, प्रिया वेलकर, अनिल चोपडा, संजना कीर, संदीप शिवलकर, प्रकाश पावस्कर, अक्षया नाईक, चेंढरेचे माजी सदस्य अॅड. परेश देशमुख, नागेश कुलकर्णी, समीर ठाकूर, यतीन घरत, ममता मानकर, प्रशांत फुलगांवकर, प्रताप राऊत, संतोष पालकर, राम थळे, अमित नारे, रवि आंबेकर, संदीप किर, विनोद सुर्वे, शिवदास भगत, चिंतामण भगत, गणेश मुकादम, भगवान वरसोलकर, दत्ता लाते, पांडूरंग पेरेकर, जितेन सरतांडेल, आकाश पाटील, जनार्दन वरसोलकर, सुभाष वरसोलकर, विश्वनाथ पेरेकर, संजय कांबळे, बंड्या भगत, वासंती मुकादम, नासिकेत वरसोलकर, गजानन कुंडी, संदीप ढवळे, दिनेश कवाडे, मिथून बेलोसकर, सुरेश पाटील, शरद कापसे, नागेश्वरी हेमाडे, चापडे सर, भगत सर, चवकर, प्रशांत घरत, रामचंद्र लाडू, अॅड. रेश्मा चिमणे, अनिल चिमणे, दिलीप मानकर, विरेंद्र साळवी, विलास म्हात्रे, नरेश बैरी, लक्ष्मण पवार, सदी मासम, मोहनशी आचार्य, अभिजीत सातमकर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.