नवीन खेळाडू अजमाविण्यासाठी वरिष्ठांना सुट्टी

| त्रिनिदाद | वृत्तसंस्था |

आगामी काळात होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाच्या तयारीसाठीच विराट कोहली, रोहित शर्मा यांना विंडिजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात सुट्टी देण्यात आली होती. हा संघाच्या तयारीचाच एक भाग होता, अशी प्रतिक्रिया भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी व्यक्त केली आहे.

दुसऱ्या सामन्यातील संघाच्या पराभवानंतर ते प्रसारसाध्यमांशी बोलताना म्हणाले की, या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली, जेणेकरून भारतीय संघ आशिया चषकापूर्वी काही खेळाडूंबाबत निर्णय घेऊ शकेल. अनेक प्रमुख खेळाडू दुखापतीतून बाहेर पडत आहेत आणि त्यांच्या खेळण्याच्या दिवसांबद्दल अजूनही अनिश्चितता आहे. अशा परिस्थितीत, त्याला इतर खेळाडूंना सर्वात वाईट परिस्थितीसाठी तयार करण्यासाठी सामने खेळायला वेळ द्यायचा आहे, असेही द्रविडने स्पष्ट केले.

आम्ही वेगवेगळ्या खेळाडूंना आजमावत होतो. संघाला त्या युवा खेळाडूंना संधी द्यायची होती जेणेकरून सर्वात वाईट परिस्थितीतही त्यांच्याकडे खेळाचा थोडा का असेना अनुभव असेल. यामुळे आम्हाला आगामी काही काळात येणाऱ्या आशिया चषक आणि विश्वचषक या दोन मोठ्या स्पर्धांसाठी खेळाडू निवडण्याची अधिक संधी मिळेल. आशिया चषकापूर्वी आमच्याकडे या एकदिवसीय प्रकारच्या मालिकेत फक्त 2-3 सामने आहेत. विराट आणि रोहित सतत खेळत आहेत हे तुम्हाला माहीत आहे. त्यामुळे आम्ही आणखी पर्याय शोधत आहोत.

राहुल द्रविड, प्रशिक्षक

द्रविड पुढे म्हणाला, जर प्रामाणिकपणे सांगायचे तर, आम्हाला जास्त पर्याय मिळणार नाहीत, परंतु तुम्हाला माहित आहे की, आमचे अनेक महत्वाचे खेळाडू जखमी आहेत आणि ते एन.सी.ए.मध्ये सराव करत आहेत. अजूनही त्यांच्या खेळण्याबाबत अनिश्चितता आहे. त्यामुळे आम्हाला आणखी काही खेळाडूंना संधी द्यायची आहे, जेणेकरून गरज पडल्यास ते खेळू शकतील.

Exit mobile version