महावितरणाचे अक्षम्य दुर्लक्ष
| सुधागड-पाली | वार्ताहर |
सुधागड तालुक्यातील जांभुळपाडा, टाटाचा माळ येथे अर्धवट तुटलेल्या विजेच्या खांबामुळे एका चारचाकी गाडीचे नुकसान झाले होते. येथे लोखंडी खांब बदलून नवीन सिमेंटचा खांब लावण्यात आला आहे. परंतु, लोखंडी खांब रस्त्याच्या दिशेने मान टाकून असल्याने चारचाकी गाडीचा पत्रा कापला गेला. या विजेच्या खांबाकडे महावितरणने दुर्लक्ष केले असून, एखादा मोठा अपघात होऊन जीव जाण्याची महावितरण वाट बघत आहे का, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.
टाटाचा माळ येथे रस्त्यालागतच दर्शनी भागात हा खांब असून, हा लोखंडी खांब अर्धवट कापलेल्या स्थितीत चार वर्षांपासून आहे. रात्रीच्या अंधारात हा खांब अपघातास कारण ठरु शकतो. याला सर्वस्वी महावितरण जबाबदार असेल, असा संताप नागरिकांकडून केला जात आहे.