| नेरळ | प्रतिनिधी |
कळंब गरुडपाडा येथील एका फार्म हाऊस मधील बंद घरात घुसून सुमारे 2 लाखांचा किंमती ऐवज लंपास करण्यात आला आहे. मुज्जमिल सलीम शेख,रा.पनवेल यांच्या मालकीचा हा फार्महाऊस आहे. दिवसभर माळी कामगार असतात आणि रात्री कोणीही व्यक्ती राहत नाही.त्या फामहाऊसमधील शेख यांचा बंगला असून त्या बंद घरात घुसून अज्ञात चोरट्यानी घुसून चोरी केली. चोरट्यांनी कपाटात ठेवलेली सोन्याचे दागिने तसेच टिव्ही फ्रिज एसी अशा वस्तू तसेच जेवण बनविण्याची भांडी आणि गार्डन मध्ये ठेवलेले जलवाहिनीचे पाईप यांची देखील चोरी केली आहे. मुजमिल शेख यांच्या घरातून चोरट्यांनी लाकडी कपाट फोडून त्यातील सोन्याची गंठण,सोन्याची साखळी आणि कानातील कर्णफुले अशा 29 ग्राम वजनाचे दागिने यांची चोरी केली आहे.तर दोन वातानुकूलित यंत्र तसेच डबल डोअर फ्रिज आणि एलईडी टीव्ही नेला आहे.तर घरात वापरली जाणारी दोन पोती भांडी देखील चोरट्यांनी लंपास केली आहेत.
चोरट्यांनी साधारण एक लाख 81 हजाराचा ऐवज लंपास केला असल्याची नोंद केली आहे.तर नेरळ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत शिंदे आणि पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत काळे हे अधिक तपास करीत आहेत.