। माणगाव । सलीम शेख ।
खासगी प्रवासी बस ताम्हिणी घाटात डोंगराला धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात तब्बल 27 प्रवासी जखमी झाले आहेत. या जखमी प्रवाशांमधील आठ ते दहा प्रवासी गंभीर झाले आहेत. ही घटना माणगाव तालुक्यातील ताम्हिणी घाट परिसरात शुक्रवारी (दि.2) साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. पुण्याहून माणगावच्या दिशेनं येणारी खासगी प्रवासी बस ताम्हिणी घाटातील गारवा हॉटेल परिसरात रस्त्याच्या कडेला असलेल्या डोंगराला जोरात धडकली. कारला वाचवण्याच्या नादात ही भरधाव बस डोंगराला धडकल्याची माहिती यावेळी स्थानिक नागरिकांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही बस सकाळी साडे अकराच्या सुमारास पुण्यातील भोसरी परिसरातून निघाली होती. बसमध्ये भोसरी येथील सावन प्रा. लिमिटेड कंपनीचे 50 कर्मचारी होते. हे सर्वजण काशिद बीचला फिरायला जात होती. दरम्यान, शुक्रवारी दुपारी ही खासगी बस ताम्हीणी घाटात आली असता एका तीव्र वळणावर चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं. अपघातानंतर बसमधील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. बसचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला असून, अनेक प्रवासी सीटमध्ये अडकले होते. अपघाताची माहिती मिळताच माणगाव पोलीस, स्थानिक नागरिक आणि आपत्कालीन बचाव पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झालं. जखमींना बाहेर काढून तात्काळ माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या जखमी प्रवाशांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
ही बस रस्त्यावरून खाली उतरली आणि बाजुच्या खडकाळ भागाला जाऊन धडकली. यावेळी या बसने एका कारलादेखील उडवलं. ही अपघातग्रस्त कारही रस्ता ओलांडून एका झाडीत जाऊन अडकली. या अपघातात 27 प्रवासी जखमी झाले असून 8 ते 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना उपचारसाठी माणगाव उपजिल्हा रुग्णालयला पाठवण्यात आले आहे.
हा अपघात ताम्हिणी घाटातील प्रसिद्ध गारवा हॉटेल परिसरात झाला. तीव्र वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला असलेल्या डोंगरावर जाऊन आदळली. बस दरीत कोसळली असती तर मोठा अनर्थ घडला असता, मात्र डोंगराला धडकल्यामुळे बस थांबली. या धडकेचा वेग इतका प्रचंड होता की बसमधील प्रवासी जागीच जखमी झाले आणि बसचेही मोठे नुकसान झाले आहे. घटनेनंतर काही काळ ताम्हिणी घाट मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून, पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, जखमींच्या प्रकृतीकडं प्रशासनाचं लक्ष असून, आवश्यक ती वैद्यकीय मदत दिली जात असल्याची माहिती माणगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक निवृत्ती बोराडे यांनी दिली आहे.
जखमींची नावे
तृप्ती कोळणे (27), हर्षन एव्हल (24), नुमान अत्तार (23), समीर साळुंखे (38), सुजल घोरपडे (21), तोहिद शेख (25), स्नेहल वर्मा (21), आफरीन इमामदार (25), मालकिनी लोटे (29), खुशबू जिसान (34), श्वेता उघाडे (22), अंजली गडकर (31), वर्षा मार्लर (27), प्रीती मोरे (23), सारिका मुजेवार (43), साक्षी पाटील (24), अंजली डायव्ह (26), वैभव सांबुचे (26), कृष्णा भोसले (30), तृप्ती चव्हाण (37), पाटील महादेव रेही (31), नवीन वाळुज (28), विकास कांबळे (31), आसिफ शिगलगाकर (29), शुभम साधू (24), गणेश देशमुख (28), अभिषेक वहार (26), प्रवीण विठेकर (53), प्रतीक्षा टिके (27), संदेश बहामर (37), सृष्टी कदम (24), वर्षा नंदरगो (27), सुनफर खलिफ (33), सुमन अत्तार (23), वैष्णवी मोरे (48), आकाश कोवळे (28), वैष्णवी काटकर (48), अमर चलवाडी (25), आकाश नारायण (28), प्राची चन्ने (28), प्राजक्ता मोरे (20), प्रसाद भालेराव (20), प्रशांत बांगर (45), जितेश चांदनीपुरे (35), कुणाल बडे (34), प्रिया सुतला (35), सागर कापडे (29), प्रदीप लाडे (43), धनंजय यकासरे (29), सचिन बोधे (36)






