| पनवेल | वार्ताहर |
बेकायदा अग्नीशस्त्र व जिवंत काडतुसे जवळ बाळगल्या प्रकरणी पनवेल तालुका पोलिसांनी एका तरुणाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे. आरोपी रजनीशराज सत्येंद्रकुवर सिंग रा.इंडिया बुल्स याच्याकडे सिल्वर रंगाचे लोखंडी पिस्ट्ल ज्याची किंमत पन्नास हजार रुपये इतकी आहे. तसेच चार जिवंत पितळी काडतूसे असा मिळून जवळपास पन्नास हजार आठशे रुपये किमतीचा ऐवज विनापरवाना जवळ बाळगून असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पोवार, गुन्हेशाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय गळवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्चना कुदळे व पथकाने सदर तरुणाला कोनगाव येथून ताब्यात घेऊन त्याच्या कडून बेकायदा अग्नीशस्त्र व जिवंत काडतुसे हस्तगत केले व त्याच्या विरोधात पनवेल तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
काडतुसे जवळ बाळगल्या प्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल
