चौघांविरूद्ध जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल

| पेण | प्रतिनिधी |

पेण तालुक्यातील गौवळणवाडी गावातील तक्रारदार वामन दरोडा यांनी चौघांविरूद्ध तक्रार नोंदविली आहे. हिरामण ठोंबरा, काशिनाथ ठोंबरा, परशुराम वाघ आणि भानुदास दरोडा यांनी फिर्यादीचे मेहुणे व सासरे गावात जादूटोणा करतात, त्यामुळे गावात बिमारी व मरणदाजी झाली आहे. अशाप्रकारे बोलून गावातील मिटींगमध्ये अंधश्रध्दा पसरवली तसेच फिर्यादीचा अपमान करून धमकी दिली आहे. म्हणून पेण पोलीस ठाण्यात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध करण्याकरिता व त्यांचे समूळ उच्चाटनाकरिता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलीस निरीक्षक संदीप बागूल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नवरखेडे हे अधिकचा तपास करत आहेत. सदरील घटना पेण तालुक्यातील सावरसई ग्रामपंचायतीमधील गौवळणवाडी येथे घडली आहे.

Exit mobile version