शिक्षकाला मारहाण प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल

। माणगाव । प्रतिनिधी ।
मुलाची शिष्यवृत्ती जमा का केली नाही, असे बोलून शिवीगाळी करून शिक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी आरोपीवर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि.27) दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास लोणशी आदिवासीवाडी येथे घडली. याबाबत शिक्षक नंदकुमार पांडुरंग केकाणे (वय56) यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.

नंदकुमार पांडुरंग केकाणे हे जिल्हा परिषद शाळा लोणशी आदिवासीवाडी येथे इयत्ता पहिले ते चौथीपर्यंतच्या मुलांना एकत्रित शिकवत असताना आरोपी रमेश यशवंत काटकर (35) यांनी शाळेच्या वर्गात येऊन शिवीगाळी केली. तसेच शाळेमध्ये असलेली पाण्याची प्लॅस्टिकची बादली डोक्यात मारून दुखापत केली.
याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक लहांगे अधिक तपास करीत आहेत.

Exit mobile version