महिलेवर अत्याचार करणाऱ्यावर गुन्हा दाखल

| पनवेल | वार्ताहर |

महिलेला ब्लॅकमेल करून तिच्यावर अत्याचार करताना काढलेले फोटो महिलेच्या पतीसह त्यांच्या नातेवाईकांना पाठविण्याचा प्रकार करणाऱ्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खारघर परिसरात राहणाऱ्या एका विवाहित महिलेबरोबर सदर इसमाची मैत्री झाली. या ओळखीचा फायदा त्या इसमाने सदर महिलेचे फोटो काढले होते. हे फोटो पतीला दाखविण्याची भीती दाखवून त्याने तिच्यावर अनेकदा अत्याचार केले. त्या त्रासाला कंटाळून अखेरीस या महिलेने त्याला टाळण्यास सुरूवात केली. परंतु, सदर इसमाने या महिलेचे फोटो तिच्या पतीसह नातेवाईकांना पाठविल्याने हा प्रकार उघडकीस आल्यावर महिलेने वाच्यता केली. त्यानुसार खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version