| नवी मुंबई । प्रतिनिधी ।
थकबाकीपोटी खंडीत केलेला वीज पुरवठा सुरु झाला असल्याचे आढळल्याने कारवाई करण्यासाठी गेलेल्या भरारी पथकातील एका कर्मचार्याला मारहाण केल्याची घटना डोंबिवलीतील आजदे गाव येथे घडली आहे. पथकातील कर्मचार्यासह महिला विद्युत सहाय्यकाला देखील यावेळी शिवीगाळ करण्यात आली. याप्रकरणी मानपाडा पोलिस सरकारी कामात अडथळा व मारहाण केल्याप्रकरणी नागेश गमरे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावितरण कर्मचार्यांवरील हल्ल्यांच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याचे या घटनेवरुन स्पष्ट होत आहे.
डोंबिवली आजदे परिसरात महिला विद्युत सहायक विजया भुयारकर या बाह्यस्त्रोत कर्मचारी आकाश गिरी याच्यासह तपासणीचे काम करत होत्या. रघुनाथ आवटे या ग्राहकाचा थकबाकी पोटी खंडित करण्यात आला होता. मात्र, याठिकाणी परस्पर केबल जोडून वीजपुरवठा सुरू असल्याचे आढळून आले. त्यानुसार कारवाई करताना भाडेकरू असणार्या आरोपी गमरे याने बाह्यस्त्रोत कर्मचारी आकाश गिरी यांना मारहाण केली व महिला विद्युत सहायक भुयारकर यांना शिवीगाळ केली. भुयारकर यांच्या फिर्यादीवरून मानपाडा पोलिसांनी गमरे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आहे.