| उरण | वार्ताहर |
कळंबुसरे गावातील माजी सरपंच सुशील राऊत यांच्या वर चिरनेर रस्त्यावर शनिवारी हल्ला झाल्याची घटना घडली आहे. त्यांना दुखापत झाली असल्याने ते उलवे नोड येथील गँलेक्सी रुग्णालयात उपचार घेत आहेत. या घटनेसंदर्भात उरण पोलीस ठाण्यात हल्लेखोरा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राऊत हे काही कामानिमित्त जात असताना कैलास जयराम नाईक यांनी त्यांची गाडी अडवत मारहाण केली. हल्ल्याचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.