रिक्षा चालकावर गुन्हा दाखल

। पनवेल । वार्ताहर ।

रिक्षा चालकाने एका महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार पनवेल तालुक्यातील साईनगर येथे घडला. या प्रकरणी रिक्षा चालकाविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

36 वर्षीय महिला या चारचाकी वाहनातून जात होत्या. यावेळी त्यांच्या विरुद्ध दिशेने येणार्‍या रिक्षा चालकाने गाडी मागे घे, या कारणावरून त्यांच्यासोबत शाब्दिक वाद केला. रिक्षा चालकाने पीडित महिलेचा विनयभंग करीत तिला शिवीगाळ केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version