| पनवेल | वार्ताहर |
एका महिलेला वेगवेगळे टास्क देऊन दोन लाख 75 हजार रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी अनोळखी व्यक्तीविरोधात कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. रोशनी द्विवेदी या कामोठे, सेक्टर 22 येथे राहतात. त्यांनी फेसबुकवर नेक्स्ट स्टॉप कीड मॉडेल अशी जाहिरात पाहिली. त्याखाली दिलेल्या लिंकवर त्यांनी क्लिक केले. यावेळी लहान मुलांचे मॉडेलचे फोटो होते. यावेळी तुमच्या मुलाचेदेखील फोटो पाठवा, असे सांगण्यात आले. त्यांनी टेलिग्रामवर मुलाचे फोटो पाठवले. ते लाईक करण्यासाठी पॉइंट मिळतील व शंभर पॉइंट झाल्यास मुलाला मॉडेलिंगकरिता संधी मिळेल, असे सांगण्यात आले. त्यांना दोन हजार 800 रुपये परत मिळाले. त्यानंतर त्यांच्याकडून दोन लाख 75 हजार रुपयांची मगाणी करण्यात आली. ते दिल्यानंतर त्यांनी कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने त्यांची फसवणूक झाल्याचे समजतात त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.