| पनवेल | वार्ताहर |
कस्टम विभागाकडून कस्टमर ड्युटी भरणा न केलेल्या मालाची वेअर हाऊसमधून चोरी करून विकल्या प्रकरणी चौघाविरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अब्दुल नाटेकर यांचा रोहिंजण कंटेनर यार्ड या नावाने वेअर हाऊस आहे. बाहेर देशातून आलेला मालाची कस्टम ड्युटी भरणे बाकी आहे, असा माल गोडाऊनमध्ये साठवून ठेवत असतात. कस्टमकडून क्लिअर झाल्यानंतर हा माल पुढे त्यांच्याकडे मयुरेश चासकर, सुशीलकुमार मंडल, इस्लाम मुस्लिम हे तिघेजण काम करतात. जुलै 2022 ते 2023 पर्यंत कस्टम ड्युटी भरण्याने केलेला माल त्यांच्या वेअर हाऊसमध्ये साठवणूक करून ठेवलेला होता.
2023 मध्ये कस्टमच्या अधिकारी त्यांच्या कंटेनर यार्डमध्ये आले यावेळी वेअर हाऊसमध्ये ठेवलेला माल चोरी करून विक्री केला जात असल्याचे त्यांना समजले. नऊ कोटीचा माल वेअरहाऊस मधून विकला गेला असून त्या ठिकाणी सर्व कचरा भरून ठेवल्याचे कस्टम अधिकाऱ्यांनी कळवले. याबाबत मयुरेश चासकर आणि मंडळ यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी काहीही माहिती नसल्याचे सांगितले. त्यानंतर मयुरेश चासकर यांच्याकडे चौकशी केली असता त्याने कस्टमचा माल सहा महिन्यांपूर्वी शैलेश ठाकूर व सुशील मंडळ व महेश शिवाले यांनी काढून नेला असल्याचे कबूल केले. याप्रकरणी मयुरेश चास्कर, सुशील कुमार मंडल, शैलेश ठाकूर आणि महेश शिवाले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.