चेक बाऊन्सप्रकरणी गुन्हा दाखल

| पनवेल | वार्ताहर |

माल घेऊन त्याची ठरलेली रक्कम परत न करणाऱ्या व चेक बाऊन्स केल्याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विनोद कुमार बंसल हे खारघर सेक्टर 34 ‘ए’ येथे राहात असून, त्यांचा विजय स्टील नावाने पळस्पे फाटाजवळ कोळखे गाव येथे स्टीलचा व्यवसाय आहे. मे मध्ये शोएब खान आणि ऋषी हे दुकानावर येऊन त्यांनी इमरान खान यांच्यासोबत एम.आय. ट्रेडिंग नावाने स्टीलचा व्यवसाय करत असून ऑफिस मिरा रोड येथे आहे व स्टीलची आवश्यकता असून, ॲडव्हान्स पेमेंट देऊन बिल्डिंग बांधण्यासाठी लागणारे स्टील खरेदी केले. बऱ्याच वेळा त्यांनी स्टील खरेदी केले व पेमेंट केले. त्यामुळे त्यांनी विश्वास संपादित केला होता. त्यानंतर जूनमध्ये फोन द्वारे संपर्क साधून दोन गाड्यांमध्ये 160 किलो वजनाचे 64 हजार 65 रुपये किमतीचे स्टील पाठवून देण्यात आले. दोन दिवसांनी पेमेंट करतो असे सांगितले. या मालाचे पेमेंट न केल्याने संपर्क साधला असता पेमेंट देणार असल्याचे सांगितले त्यानंतर सतत उडवा उडवीची उत्तरे दिली व पेमेंट करण्यास टाळाटाळ करू लागला.

मिरा रोड येथे इमरान खान याला भेटले असता समोरील पार्टी कडून पेमेंट येण्यास अडचण येत असल्याचे सांगितले. त्यानंतर इमरान खान, शोएब खान व ऋषी यांच्याशी संपर्क साधून पेमेंट विचारणा केले असता त्यांनी टाळाटाळ करून स्टीलचे पेमेंट दिले नाही. त्यानंतर नोटरी कराराप्रमाणे चेक दिला मात्र तो देखील चेक बाऊन्स झाला आहे. विनोद कुमार बंसल यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच इमरान खान, शोएब खान आणि ऋषी यांच्या विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version