| पनवेल | वार्ताहर |
भाजपच्या माजी नगरसेवकावर पनवेल तालुका पोलीस ठाण्यात सोमवारी (दि.28) वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये भाताण येथील बबन नामदेव मुकादम यांच्या घराच्या वीज पुरवठ्याची महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली. त्यावेळी त्या ठिकाणच्या रूमसाठी मीटर नसून थ्री फेज इनकमिंग वायरला टॅपिंग करून डायरेक्ट सप्लाय घेतले असल्याचे आढळून आले. बबन मुकादम यांनी अनधिकृतपणे वीज पुरवठा वापरून बारा महिन्यांपासून 2 हजार 635 युनिटचे 57 हजार 80 रुपयांची वीज चोरी करून महावितरणचे नुकसान केले.







