। पनवेल । वार्ताहर ।
ब्लु पँथर संघटने तर्फे पनवेल तालुक्यातील बौद्ध समजातील डॉक्टर, वकील, सरपंच, उपसरपंच तसेच आंबेडकरी चळवळीला योगदान देणारे कार्यकर्ते यांचा सन्मान करण्यात आला. समजातील नामवंत व्यक्तीने समजातील प्रत्ये व्यक्तीचा सन्मान करावा, या उद्दिष्टाने एक नवीन संकल्पणा आमलात आणून यावेळी समजातील नामवंत व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. यामध्ये 30 वकील 30, 6 डॉक्टर, 2 सरपंच, 14 ग्रामपंचायत सदस्य, 47 आंबेडकर चळवळी साठी योगदान देणारे कार्यकर्ते तसेच 25 दिवंगत आंबेडकर चळवळीसाठी योगदान देणार्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी शिरीष भटांगे, कुमार मेटोंगे, नंदकुमार गायकवाड, के.के. गायकवाड, नरेंद्र गायकवाड, विजय गायकवाड, प्रभाकर कांबळे, अॅड. राजेश खंडागळे, राज सदावर्ते, प्रवीण खंडागळे, विजय बाबरे, जयवंत बाबरे, शंकर वायदंडे, सुभाष वाघपंजे, मच्छिंद्र कांबळे, सचिन गायकवाड, राहुल गायकवाड, सचिन कांबळे, मंगेश गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.







