| खोपोली | वार्ताहर |
खोपोली येथे आज बुधवार (दि.25) एका टँकरचा अपघात झाला. त्यानंतर या अपघातग्रस्त टँकरने पेट घेतला. या आगीत पार्किंग केलेली एक कार जळून खाक झाली आहे. खोपोली शिळफाटा येथे ही घटना घडली आहे. पेटत्या टँकरमधून वाहणार रसायन पेटत पसरत असल्याने परिसरात घबराटीचे वातावरण आहे. या घटनेची माहिती मिळताच बचाव पथक, अग्नीशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. फोमचा वापर करून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.







