किहीम फेस्टिव्हलची रंगारंग सांगता

| अलिबाग | प्रतिनिधी |

लायन्स क्लब मांडवाच्या किहीम फेस्टिव्हलचा सांगता सोहळा सोमवार (दि. 25) राजा शिवछत्रपती क्रीडांगण किहीम येथे आयोजित करण्यात आला होता. चार दिवस येथे विविध उद्योजक, ग्राहक, कलाकार, रसिक, पर्यटक यांना एकत्र आणून त्यांच्यामध्ये सुंसवाद घडवून आणण्यात हा फेस्टिव्हल यशस्वी ठरला.

सांगता सोहळ्याची सुरुवात पाककला स्पर्धेने झाली. याप्रसंगी प्रथम उपप्रांतपाल एन.आर. परमेश्‍वरन, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उद्योजक जितेंद्र बेर्डे, विद्या अधिकारी, आरसीएफचे कार्यकारी संचालक (थळ) अनिरुद्ध खाडिलकर, महाव्यवस्थापक संजीव हरळीकर, किहीमचे सरपंच प्रसाद गायकवाड,अरुण भोर, नयन कवळे, लायन्स किहीम फेस्टिव्हलचे अध्यक्ष धवल राऊत, अभिजीत गुरव, जितेंद्र ठाकूर यांच्यासह फेस्टिव्हल नियोजन समितीचे नितीन अधिकारी, अमिष शिरगावकर, अरविंद घरत, सुबोध राऊत, मोहन पाटील आदींसह लायन्स क्लब पोयनाडचे प्रदीप सिनकरही उपस्थित होते.

पाककला स्पर्धेतील विजेत्यांना अभिनेत्री किशोरी आंबिये, श्रुती सरनाईक, विनायक शेडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आले. पाककला स्पर्धेत किहीमच्या प्रिया वंजारे यांना प्रथम क्रमांक, किहीमच्या प्रियंका राऊत यांना द्वितीय क्रमांक, झिराडच्या जागृती पेढवी यांना तृतीय क्रमांक, तर कामथच्या ललना काठे यांना उत्तेजनार्थ प्रथम, चोंढीच्या वर्षा जगताप यांना उत्तेजनार्थ द्वितीय, कामथच्या कल्पना काठे यांना उत्तेजनार्थ तृतीय क्रमांकाने सन्मानित करण्यात आले.

Exit mobile version