महाडमध्ये ‘नारा’! मी गाढव आहे, ते मला मान्य आहे…

शिवसैनिक नाराज; नारायण राणेंचे महाडमध्ये पोस्टर

। महाड । प्रतिनिधी ।
केंद्रीय मंत्री नारायण राणे हे काल रायगड जिल्ह्यात आले असता त्यांनी महाडमध्ये पत्रकार परिषद घेतली. त्यावेळेस बोलताना ते म्हणाले कि, देशाच्या स्वातंत्र्याला किती वर्षे झाली हे मुख्यमंत्र्यांना माहीत नाही. कुणाला तरी विचारतात हिरक महोत्सव का? मी असतो तर कानाखाली चढवली असती. देशाच्या स्वातंत्र्यदिनाची माहिती नसावी ही किती चीड आणणारी गोष्ट आहे. सरकार कोण चालवतंय ते कळतच नाही. त्या सरकारला ड्रायवरच नसल्याचे नारायण राणेंनी त्यांवेळी सांगितले.

नारायण राणे यांनी असे बेताल वक्तव्य केल्यामुळे संपुर्ण महाराष्ट्रात शिवसैनिक नाराज झाले आहेत. याच निषेधार्थ मंगळवारी सकाळी महाडमधील नातेखिंडमध्ये शिवसैनिकांनी त्यांना गाढवावर बसवून मी गाढव आहे, ते मला मान्य असल्याचा नारा दिला. तसेच युवासेनेचे सिद्धेश पाटेकर यांनी महाड पोलीस ठाण्यात नारायण राणे यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

आमदार भरत गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळेस उपस्थित तालुकाध्यक्ष सुरेश महाडीक, शहर अध्यक्ष नितीन पावले, युवासेनेचे सिद्धेश पाटेकर, बंटी पोटफोडे व सभापती संजय कचरे, राजिप सदस्य मनोज काळींजकर आदींसह महिला पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version