| वणी | वृत्तसंस्था |
नांदुरी – सप्तशृंगी गड घाट रस्त्याच्या मध्यवर्ती ठिकाणी रविवारी, (दि.25) रोजी सांयकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास दरड कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दिड तास वाहतूक बंद करण्यात आली होती.
श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडावर गेल्या पाच- सहा दिवसांपासून पाऊस सुरु असून रात्रीपासून सतंतधार सुरु आहे. नांदुरी – सप्तशृंगी गड घाट रस्त्याच्या मधोमध पाच किमी अंतरावर डोंगरमाथ्यावरुन दरड घाट रस्तावर पडली. याची माहीती मिळताच चालता बोलता मदत केंद्राचे संस्थापक व अध्यक्ष संदीप बेनके व सहकारी शिवा बिन्नर यांनी घटनास्थळी धाव घेवून रस्त्यावरील वाहतुक थांबवून रस्त्यावर आलेली, दरड व मलबा हटविण्यास सुरुवात केली. दरम्यान सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांनाही याबाबतची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन पथकासह घटनास्थळी दाखल होत. भर पावसात रस्तावर असलेला मलबा व दरड रस्त्याच्या बाजूला हटवली.