| नाशिक | प्रतिनिधी |
नाशिकच्या वडाळ नाका भागात कामावरून घरी परतत असताना एका दुचाकीस्वाराचा नायलॉन मांजाने गळा कापल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुशरन मोहसीन सय्यद असे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुशरन सय्यद हे मेनरोड येथील कापड दुकानात कामाला आहेत. मुसरन हे सायंकाळी दुचाकीवरून वडाळा नाका परिसरात जात असताना त्यांच्या गळ्याला नायलॉन अडकला. त्यामुळे ते गंभीर जखमी होऊन रस्त्यावर कोसळले. त्याच अवस्थेत नागरिकांनी त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.