| मुंबई | प्रतिनिधी |
गुंगीचं औषध देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना मुंबईत घडली आहे. 15 वर्षांच्या मुलीच्या शितपेयात गुंगीचं औषध टाकलं, त्यानंतर बेशुद्ध अवस्थेमध्येच तिच्यावर अत्याचार केले गेले. मुंबईच्या चेंबूरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. चेंबूरच्या वाशीनाका भागात ही घटना घडली आहे. चुलत काकानेच त्याच्या अल्पवयीन पुतणीवर अत्याचार केले आहेत. कपडे घेऊन देण्यासाठी पैसे देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीला मैत्रिणीच्या घरी बोलावलं, त्यानंतर काकाने मुलीच्या शितपेयात गुंगीचं औषध मिसळलं आणि ते शितपेय मुलीला प्यायला दिलं. हे शीतपेय प्यायल्यानंतर मुलगी बेशुद्ध पडली आणि त्यानंतर काकाने आपल्याच पुतणीवर अत्याचार केले. याप्रकरणी नराधम काकाला आरसीएफ पोलिसांनी अटक केली आहे.