| इगतपुरी | प्रतिनिधी |
मध्य रेल्वेच्या इगतपुरी जवळील कसारा घाटातील दोन नंबर बोगद्याच्या तोंडावर आज सकाळी 8.30 वाजता दरड कोसळल्याची घटना घडली आहे. दरड कोसळताना ती ओव्हर हेड वायर पडल्याने ओव्हरहेड वायर ही क्षतिग्रस्त झाली आहे. त्यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. या घटनेमुळे अप मार्गाची वाहतूक मिडल लाईनवरून वळण्यात आली आहे. अगोदर थोड्या वेळापूर्वीच पंचवटी एक्स्प्रेस येथुन पास झाल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. मध्य रेल्वेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरड हटविण्याचे व ओव्हर हेड वायर दुरुस्त करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. अप लाईन सुरळीत होण्यासाठी अजून पाच ते सहा तास लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.