अरे बापरे! दृश्य पाहून नागरिकांची धावाधाव

| अलिबाग | प्रतिनिधी |
माणगावमधील कचेरी रस्त्यालगत असलेल्या एका वसाहतीमध्ये मगर घुसली होती. माणगावचे वन विभाग, पोलीस व कोलाडमधील वन्यजीव संस्थेच्या टीमच्या मदतीने मगरीला मध्यरात्री पकडण्यात आले. रात्री अकरा ते एक अशा दरम्यान दोन तासाच्या प्रयत्नाने मगरीला ताब्यात घेऊन तिला सुखरूप सोडले. मानवी वस्तीत मगर आल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले होते. एका बाजूला पावसाचा जोर, तर दुसऱ्या बाजूला काळोख अशा अवस्थेत एक साहेसहा फुट लांबीची मगर माणगावमधील कचेरी रोड जवळील ओम अपार्टमेंटच्या प्रवेश द्वारासमोर रात्री अकराच्या सुमारास स्थानिकाला दिसली. अचानक आरडा ओरड सुरू झाल्याने आजूबाजूतील नागरिकांचा जमाव झाला मगरीला बघून भिती निर्माण झाली.

या घटनेची माहीती मिळताच माणगावचे वन परिक्षेत्र अधिकारी अनिल ढगे, पोलीस, कोलाड येथील वन्य जीव संस्थेची टीम घटना स्थळी दाखल झाली. प्रवेशद्वाराच्या गेटजवळ मगर कोपऱ्यात होती मगर जशी हालचाल करत होती तशी तेथील नागरिक आरडा ओरड करत होते. काहींनी गोंधळ घातल्याने मगरीला पकडताना तारेवरची करावी लागली. अखेर पोलीसांच्या मदतीने जमावाला दूर करण्यात आले त दोन तासाच्या प्रयत्ना नंतर एक वाजण्याच्या सुमारास मगरीला पकडण्यास यश आले.

गेल्या चार दिवसापासून सतत पाऊस पडत आहे नद्यांना पूर आल्याने ही मगर पाण्याच्या प्रवाहात वाहत सोसायटीजवळील नाल्यात आली असाव. तिला जाण्यास मार्ग मिळाला नसल्याने ती या सोसायटीच्या जवळ आली. गेट उघडले असल्याने तिने आत जाण्याचा प्रयत्न केला असल्याचा अंदाज वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल ढगे यांनी व्यक्त केला. मगरीमुळे कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र अशा परिस्थितीत नागरिकांनी संयम पाळावा, असे आवाहन वन विभागामार्फत करण्यात आले आहे. कारण गडबड गोंधळ झाल्यास हे प्राणी हल्ला करण्याचा धोका अधिक असतो, असे सांगण्यात आले.

Exit mobile version