। म्हसळा । वार्ताहर ।
म्हसळा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत कोळे हद्दीतील कोंझरी बौद्धवाडी येथे स्थानिक ग्रामस्थ व मुंबईकर मंडळी यांच्या सहकार्याने श्रमदान करून नदीवर बंधारा बांधण्यात आला. प्रामुख्याने पाण्याची वाढती गरज लक्षात घेता, भीषण भासणारे उन्हाचे चटके, जनावरांना लागणारे पिण्यासाठी पाणी यावर उपाय म्हणून कोंझरी बौद्धवाडी येथील नदीवर बंधारा घालण्यात आला. सदर बंधार्याचे काम करतेवेळी म्हसळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरवठणे गण अध्यक्ष तथा पंचक्रोशी पदाधिकारी सतिश शिगवण यांसह मुंबईकरांचे विशेष सहकार्य लाभले. मुंबईतून रोहित जाधव, कुणाल जाधव, प्रसाद बुधकर, सचिन बुधकर, साळवी, रामजी जाधव, श्याम जाधव, दोन चिमुकले स्वरा शिगवण व प्रद्युम्न बुधकर या सर्वांनी विशेष मेहनत घेऊन बंधारा बांधला. या लोकोपयोगी कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.