। खरोशी । वार्ताहर ।
भाऊसाहेब नेने महाविद्यालयातील भूगोल विभाग आणि लायन्स क्लब पेण, यांच्या संयुक्त विद्यमान जिल्हास्तरीय पोस्टर प्रेझेन्टेशन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि मानवी आरोग्ययाला अनुसरून 16 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक रूपये एक हजार व सन्मानचिन्ह हेमांगी गजानन पाटील प्रथम वर्ष विज्ञान, द्वितीय क्रमांक दिव्या बालाजी आडे, रूपये सातशे व सन्मानचिन्ह प्रथम वर्ष विज्ञान आणि तृतीय क्रमांक रूपये पाचशे आणि सन्मानचिन्ह निलाक्षी धनंजय पाटील आणि निकिता गंगाराम घरत यांना द्वितीय वर्ष वाणिज्य तर उत्तेजनार्थचे रूपये तीनशे आणि सन्मानचिन्ह श्रावणी प्रमोद पाटील प्रथम वर्ष विज्ञान यांना मिळाले
परीक्षक म्हणून भाऊसाहेब नेने महाविद्यालयाचे प्राध्यापक भौतिक रुपारेल आणि धनाजी घरत शिक्षक यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अरुण पाटील यांनी पर्यावरण विषयक जनजागृतीची माहिती दिली या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे कार्याध्यक्ष वसंत आठवले प्रमुख पाहुणे युवराज महाजन (पुणे) माजी प्राचार्य जे.एन.पालीवाला महाविद्यालय पाली महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सदानंद धारप पाठक उपाध्यक्ष लायन्स क्लब अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे चेअरमन डॉ. मधुकर साळुंखे डॉ.एस. एम. नाईकडे डॉ. डि. के. बामणे डॉ. खाडीलकर, प्रा. चिटणीस, राधा घांगरेकर, विजय ठाकूर, सुषमा खोत, गोपाल जोशी तसेच महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. सुत्रसंचलन डॉ.मनिषा पाटील यांनी केले.