अलिबाग । वार्ताहर ।
अलिबाग तालुक्यातील मापगाव येथील सतीश पाटील यांचा ऑनलाईन खरीप हंगाम बीजप्रक्रीया स्पर्धा 2021 आयोजित स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक आला. हलके, किडके, रोगयुक्त, आकाराने लहान असणारे बियाणे वेगळे करुन अशा बियाण्याचे रोग व किडींपासून संरक्षण व्हावे म्हणून औषध लावण्यापर्यंतची प्रक्रीया शेतकर्यांना महत्वाची असते. बीजप्रक्रियेने पेरणीसाठी एकसारखे बियाणे उपलब्ध होते व पेरणी सुलभ होते. स्पर्धेनिमित्ताने आयोजित शेतकरी सभेत आर सी एफ चे मुख्य व्यवस्थापक शेतकरी प्रशिक्षण थळचे हेमंत गुरसाळे तसेच रायगड जिल्हा प्रभारी अमर घडवे व आर सी एफ चे कृषी साहाय्यक निखिल नांदगावकर यांच्या हस्ते सतीश पाटील यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले.