| पनवेल । वार्ताहर ।
नेरे रस्त्यावरील आकुर्ली गावाजवळील डी. पी. शेजारी पडलेला धोकादायक खड्डा बुजवावा तसेच भगतवाडी येथील रस्त्यावरील खड्डे डांबरीकरण करून बुजवावे अशी मागणी मनसेतर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करण्यात आली आहे. पनवेल ते नेरे रस्त्यावरील आकुर्ली गावाजवळील डी. पी. शेजारी पावसाळ्यात छोटे छोटे खड्डे पडले होते, त्या छोटया छोटया खडयांचे आता एका मोठ्या खड्डयात रूपांतर झोलेले आहे. या खडयांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. मागील तीन ते चार महिन्यामध्ये तेथे दोन ते तीन अपघात घडलेले आहेत. तसेच दुचाकीस्वार, रिक्षाचालक, एसटी, शाळेच्या बसेस, व्हॅन व इतर खासगी वाहनांन त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तरी आपल्या विभागाकडून सदर खड्डा लवकरात लवकर बुजवुन घ्यावा. वरील ठिकाणी गांभिर्याने विचार केला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा विश्वास पाटील, विद्याधर चोरघे, कुणाल फडके, महेंद्र शेळके, आकाश चोरघे, रचित पाटील यांच्यातर्फे देण्यात आला आहे.