| माणगाव | वार्ताहर |
काळ नदी पात्रात अज्ञात इसमाचा मृतदेह सापडल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. सदरची घटना सोमवार दि.30 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 8 वाजण्याच्या पूर्वी घडली. याबाबतची खबर दिपाली नयन खेडेकर पोलीस पाटील निजामपूर यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.
माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, घटनेतील अज्ञात इसम याचे प्रेत हे काळ नदीच्या पात्रात वाहत आल्याने तो पाण्यात बुडून मयत झाला. या घटनेची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भोसले करीत आहेत.