कामोठे परिसरात आढळला मृतदेह

| पनवेल | प्रतिनिधी |

कामोठे परिसरात एका इसमाचा मृतदेह आढळून आला असून त्याच्या नातेवाईकांचा शोध कामोठे पोलीस करीत आहेत. सदर इसमाचे अंदाजे वय 40 वर्षे, सडपातळ बांधा, डोक्यावरील केस काळे, दाढी वाढलेली असून, उजव्या हातावर कालीमातेचे चिन्ह, तसेच डाव्या हातावर आर.बी.सी. असे इंग्रजीमध्ये गोंदलेले आहे. अंगात मरुण रंगाचा टी-शर्ट व त्यावर निळ्या रंगाच्या नक्षीचा शर्ट घातलेला आहे आणि फिक्कट निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट परीधान केलेली आहे. या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी कामोठे पोलीस ठाणे किंवा सहा.पो.नि.प्रशांत तायडे यांच्याशी संपर्क साधावा.

Exit mobile version