| पनवेल | प्रतिनिधी |
अखिल भारतीय सीबीएसई शालेय राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून महाराष्ट्रासह पनवेलचे नाव उज्ज्वल करणाऱ्या खारघरच्या सई सुयोग कारंडे हिचा खारघर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. हरियाणातील कैथल येथे 14 ते 20 ऑक्टोबरदरम्यान झालेल्या स्पर्धेत सईने 17 वर्षांखालील मुलींच्या 52 ते 54 किलो वजनगटात दमदार कामगिरी करत सुवर्णपदकावर नाव कोरले. सईच्या या उल्लेखनीय यशाबद्दल युवा सेना शहरप्रमुख जयेश संजय विसावे, डॉ. श्रीनाथ प्रकाश परब, उद्योजक स्वप्नील विष्णू नानचे आणि उद्योजक मितेश मिलिंद केदारे यांनी तिच्या निवासस्थानी भेट देत कौतुक केले.







