| पनवेल | वार्ताहर |
पनवेल परिसरात एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला असून, त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत. सदर व्यक्तीचे नाव संजय राजवाडीया पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही वय अंदाजे 45 वर्षे डोक्याचे केस व दाढी मिशीचे केस काळे पांढरे असून, छातीवर उजव्या बाजुला गोंधलेले अस्पष्ठ चिन्ह व जुन्या जखमाचे वण्र दिसत आहे. अंगात निळसर रंगाचे फुलांची डिझाईन असलेला हाफ बाहयाचा शर्ट व पांढऱ्या चॉकलेटी रंगाची चेक्स असलेली लुंगी घातलेली आहे. तरी वरील वर्णनाचे इसम याचे नातेवाईक यांचे बाबत काही एक माहिती मिळाल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे येथे संपर्क करावा अगर समक्ष येवून माहिती दयावी. तसेच सहा. पोलीस निरीक्षक राजेंद्र घेवडेकर मो. नं – 9117966555, नेमणूक पनवेल शहर पोलीस ठाणे यांच्याशी संपर्क करावा.





