रानमेव्यासाठी जीवघेणी धडपड

| पाताळगंगा | वार्ताहर |
सध्या ठिकठिकाणच्या बाजारपेठेत जंगलातील रानमेवा विक्रीसाठी येत आहे. परंतु, तो काढण्यासाठी जिवघेणी धडपड करावी लागत आहे. रस्त्यालगत जांभुळ, कैर्‍या तसेच करवंदे अशी विविध झाडे असून, या झाडांवर आलेली फळे काढताना या मार्गावरून येणार्‍या वाहनांमुळे अपघात होण्याचा धोका मोठ्या प्रमाणावर संभवत आहे. मात्र, पोटाची खळगी भरण्यासाठी ही जीवघेणी धडपड करावी लागत असल्याचे आदिवासी बांधवांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

रानमेव्याच्या विक्रीतून अदिवासी बांधावांना रोजगार मिळत आहे. यामुळे रोजच्या दैनंदिन व्यवहारात आर्थिकची समस्या मार्गी लागत आहे. उन्हाळ्यात आलेला रानमेवामुळे उदरनिर्वाह होत आहे. यामुळे निसर्गातील तयार होत असलेली फळे अदिवासींसाठी मोठा दिलासा देत आहे. रणरणत्या उन्हामध्ये रानमेवा मिळविण्यासाठी आदिवासी बांधव दिवस-दिवस धडपडत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

Exit mobile version