| मुरुड जंजिरा | प्रतिनिधी |
मुरुड शीघ्रे रस्त्यावरील लक्ष्मीखार नजीक असलेल्या मोरीचे काम तातडीने सुरु करण्यासाठी गुरुवारी मंगेश दांडेकर यांच्या सोबत असणार्या असंख्य कार्यकर्त्यांनी मुरुड येथील सार्वजनिक बांधकाम खात्याचे उप अभियंता गोरे यांची भेट घेऊन त्यांना याबाबत जाब विचारण्यात आला. पावसाळा जवळ आला आहे. त्यापूर्वी शीघ्रे रस्त्यावरील लक्ष्मीखार नजीक असलेल्या मोरीचे काम तातडीने सुरु होणे खूप आवश्यक आहे. अन्यथा आजूबाजूच्या लोकांच्या घरात पावसाचे पाणी शिरून नुकसान होणार आहे. यासाठी मुरुड बांधकाम खात्याने या मोरीचे तातडीने काम सुरु करावे अशी मागणी दांडेकर यांनी केली.
यावेळी नरसिंह मानाजी, हसमुख जैन, मोहिद्दीन शेख, इम्तियाज कबले, आदेश भोईर, मुजफ्फर सुर्वे, योगेंद्र गोयजी, विजय भोय, कमरुद्दीन ह्लडे, रिजवान बोदले, तोफीक दामाद, युसूफ फहीम आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.