दीपक, नरेंदर यांची निराशाजनक सुरुवात

| इटली | वृत्तसंस्था |

भारतीय बॉक्सर्सना रविवारी अपयशाचा सामना करावा लागला. दीपक भोरिया (51 किलो वजनी गट) व नरेंदर (92पेक्षा जास्त किलो वजनी गट) या दोघांनाही जागतिक ऑलिंपिक पात्रता फेरीत हार पत्करावी लागली. अझरबैझानच्या ह्यूसेयनोव निजात याच्याकडून दीपक भोरिया याचा पराभव झाला. पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये रोमहर्षक लढत पाहायला मिळाली, पण अझरबैझानच्या युवा खेळाडूने वेगवान हालचालींच्या जोरावर पहिली फेरी व दुसरी फेरी 3-2 अशाच फरकाने जिंकली. अखेरच्या फेरीत दीपक भोरिया याने झोकात पुनरागमन केले. तसेच 4-1 असे यश संपादन केले, पण तोपर्यंत उशीर झाला होता. नरेंदर याच्यावर प्रतिस्पर्ध्याने 5-0 अशी मात केली. या स्पर्धेमध्ये भारताच्या नऊ खेळाडूंनी सहभाग घेतला आहे.

Exit mobile version