वाहतूक पोलिसांकडून माणुसकीचे दर्शन

। नवीन पनवेल । वार्ताहर ।

उरण-पनवेल रोडवर अप्पाच्या ढाब्यासमोर अज्ञात ट्रेलरला मागून ठोकर दिल्याने पिकअप चालकाच्या गुढघ्याला लागल्याने वाहतूक पोलिसांनी त्याला लगेच रुग्णवाहिकेने हॉस्पिटलला रवाना केले. त्यानंतर येथील वाहतूक सुरळीत करण्यात आली.

उरण-पनवेल हायवे, बॉम्बेपाडा, साईकृपा ढाबा येथे टेम्पो चालक गुल्फाम लिया लियाज अहमद याने अज्ञात ट्रेलरला पाठीमागून धडक दिली. यात चालक किरकोळ जखमी झाला. जखमी इसमाला गव्हाण फाटा वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार गणेश पाटील, पोलीस नाईक रवींद्र पार्ट यांनी कामोठे एमजीएम हॉस्पिटल येथे पुढील औषध उपचाराकरिता रूग्णवाहिकेमधून तात्काळ पाठवण्यात आले. त्यानंतर सदरची अपघातातील गाडी क्रेनच्या साह्याने बाजूला करून हायवेवरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.

Exit mobile version