रिक्षाखाली कुत्र्याला चिरडले; गुन्हा दाखल

| पनवेल | वार्ताहर |

ऑटो रिक्षा हयगयीने व निष्काळजीपणाने चालवून कुत्र्याच्या एका पिल्लाला दुखापत आणि दुसर्‍या कुत्र्याच्या पिल्लाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला रिक्षाचालक राजेंद्र गोरे याच्याविरोधात खांदेश्‍वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुकापूर येथील साधना कृष्णा मंडल या भटकणार्‍या कुत्र्यांना स्वखर्चाने जेवण देण्याचे काम करतात. साईधाम सोसायटीच्या समोर रस्त्यावर रिक्षाचालक राजेंद्र हे रिक्षा मागे घेत असताना कुत्र्याच्या पिल्लांच्या अंगावरून रिक्षाचे चाक गेल्याने पिल्ले जखमी झाली. तर दुसरे पिल्लू जागीच ठार झाले. याबाबत साधना मंडल यांनी दिलेल्या तक्रारीवरून रिक्षाचालक राजेंद्र गोरे याच्याविरोधात खांदेश्‍वर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Exit mobile version