कळंबोळीत रंगला कुस्तीगिरांचा मेळा

| पनवेल । वार्ताहर ।

शहर आणि कुस्ती तसा विरोधाभासच. याचे कारण म्हणजे गावच्या मातीतला हा रांगडा खेळ ग्रामीण भागातच खेळला जातो, मात्र बुधवारी कळंबोली पोलीस मुख्यालय कुस्तीक्रीडा संकुल येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल लाटे, भारत उदय श्री किताब सुवर्ण पदक विजेते यांच्या स्वर्गवासी मातोश्री कै. सुवर्णा सुदाम लाटे यांच्या 15 वें पुण्यस्मरणार्थ मुलं-मुलींचे, वय 6 ते 18 वर्ष पर्यत कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले होते. यावेळी या परिसरातील 100 ते 125 बालमल्लांनी सहभागी होऊन आपल्या नेत्रदीपक खेळाने उपस्थितांचे डोळ्याचे पारणे फेडले. विजेत्यांना तसेच सहभागी सर्व खेळाडूंना स्पर्धेचे उद्घाटक पोलिस उपआयुक्त संजयकुमार पाटील यांच्या हस्ते सन्मानित केले.

Exit mobile version